
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संलग्न, सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्राविण्य परीक्षा जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी या प्रशालेतील इयत्ता पाचवीतील कु.यश सावंत हा विद्यार्थी तसेच इयत्ता आठवीतील करिष्मा मांजरेकर व कनिष्का मकदम या विद्यार्थीनी प्रज्ञा परीक्षेस पात्र ठरल्या आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या व मंडळाचे संचालक दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ.सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










