बांद्यातील विठ्ठल मंदिरात हरिनाम वीणा सप्ताहानिमित्त धार्मिक कार्यक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: June 18, 2023 12:51 PM
views 127  views

सावंतवाडी : बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला बुधवार दि.21 जुन पासुन प्रारंभ होत आहे.या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 28 रोजी सप्ताहाची सांगता होणार असून गुरुवार दि.29 जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठी वीणा सप्ताह नियोजन प्रमुख प्रकाश मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली पारप्रमुख व सेवेकरी मंडळींची मंदिरात बैठक झाली. या बैठकीला दत्तप्रसाद पावसकर श्रीप्रसाद वाळके, सुदन केसरकर, विनित पडते, निलेश महाजन, उमेश काणेकर, भाऊ वाळके, मंगलदास साळगांवकर, उमेश मयेकर, साईनाथ तेली, संदेश पावसकर, अनिल नाटेकर, शुभम केसरकर, युवराज वाळके, मंथन विरनोडकर,धनेश नाटेकर, आशुतोष भांगले आदी उपस्थित होते.


यावेळी निश्चित केलेले सप्ताहाचे पार पुढील प्रमाणे आहेत. बुधवार दि. 21 जून रोजी सकाळी 12 वाजता श्री विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांच्या उपस्थितीत वीणा घेऊन सप्ताहास सुरुवात होईल. बुधवार दि.21 जुन आळवाडा विनीत पडते, गुरुवार दि. 22 रोजी गवऴीटेंब संदेश पावसकर, शुक्रवार दि. 23 रोजी देऊळवाडी श्रीप्रसाद वाळके, शनिवार दि. 24 रोजी हॉस्पिटल कट्टा उमेश काणेकर, भाई शिरसाट रविवार दि. 25 रोजी मारुतीगल्ली दत्तप्रसाद पावसकर, सोमवार दि. 26 रोजी गांधीचौक सुदन केसरकर, मंगळवार दि. 27 रोजी उभाबाजार निलेश महाजन बुधवार दि. 28 रोजी दुपारी 12 वाजता सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहानिमित्त दररोज नामस्मरण, भजन, गजर, सायंआरती तसेच सायं 5 ते 6.30 श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन मंडळाची भजनसेवा तर रात्री १० वाजता स्थानिक भजनकर्मींची भजनसेवा होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर, बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.