नरेंद्र डोंगर इथं हनुमान जयंती उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

Edited by: ब्युरो
Published on: April 03, 2023 21:01 PM
views 118  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील नरेंद्र डोंगर इथं हनुमान जयंती उत्सव मोठ्या दणक्यात साजरा होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन श्री हनुमान मित्रमंडळ, नरेंद्र डोंगर जुना बाजार सावंतवाडी यांनी केलंय. 

यानिमित्ताने सकाळपासूनचं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी ६ वा. २६ मि. हनुमान जन्म, अभिषेक, १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, १ ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद, सायं. ४ वाजल्यापासून तीर्थप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा, महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन श्री हनुमान मित्रमंडळ, नरेंद्र डोंगर जुना बाजार सावंतवाडी यांनी केलंय.