सालईवाड्यातील रुद्र हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 10:01 AM
views 136  views

सावंतवाडी : श्रीराम जन्मभूमी अयोध्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री रुद्र हनुमान मंदिर, सालईवाडा, सावंतवाडी मंदिरामध्ये सोमवारी २२ जानेवारी २०२४ रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वा. लघुरुद्र महाअभिषेक, दु. १२.३० वा. श्रीराम जयराम जय जय राम या विजय महामंत्राचा १०८ वेळा सामूहिक जप,दु. १.०० वा. महाआरती, दुपारी 1.00 ते 2.30 वा. महाप्रसाद व संध्याकाळ. संध्याकाळी 6.30 वा. दिपोत्सव

संध्याकाळ. 7.00 वा. भजन आणि आरतीच आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री प्रभू राम व बलवीर हनुमान रायाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे अस आवाहन श्री हनुमान पॅलेस आर्ट्स अँड स्पोर्ट्स क्लब, सालईवाडा, सावंतवाडी श्री प्रभू राम भक्त आणि श्री हनुमान भक्त सालईवाडा, सावंतवाडी यांच्याकडून करण्यात आलं आहे.