SPK च्या १९८७ च्या बी. कॉमच्या बॅचचं स्नेहसंमेलन

जुन्या आठवणींना उजाळा
Edited by:
Published on: May 03, 2025 15:30 PM
views 294  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील  पंचम खेमराज  महाविद्यालयातील १९८७ च्या कॉमर्स शाखेतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात माजी विद्यार्थी यांनी आपल्या शिक्षण काळातील आठवणींना उजाळा दिला. २७ एप्रिल २०२५ ला कुणकेरी - माडखोल इथं हे स्नेहसंमेलन झालं. जवळपास ३८ वर्षानी बी. कॉमचे जुने मित्र मैत्रीणी एकत्र आले होते. बी. कॉमच्या १९८७ चा स्नेहमेळावा व्हावा म्हणून गेली ३ ते ४ वर्षे प्रयत्न सुरु होते.  

यासाठी आनंद परुळेकर यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना सुनिल कुडतरकर, संजय म्हापसेकर, विलास नाईक, उमेश बिरोडकर, मंगेश साळगांवकर, विठ्ठल आजगांवकर, दादा भाईप, शैला दाभोळकर, विनया रेगे, गुरुनाथ नाटेकर, राजन नाटेकर आदींनी  सहकार्य केलं. या मेळाव्याला जवळपास ४२  माजी विद्यार्थी  
उपस्थित होते.  हे सर्वजण मुंबई, पुणे, बेळगाव, कणकवली, गोवा अशा दूरच्या ठिकाणाहून उपस्थित होते. कमलाकर सामंत, बाळा तळवडेकर, हरिश्चंद्र धाऊसकर, दिलीप तायशेटे, पुष्पा गावडे, हेमा चव्हाण, अभिजित घाडी, दया आळवे, राजेंद्र सामंत, निलीमा जोग, संध्या पुराणीक, शुभांगी पडते, शुभदा खानोलकर, सुहास नाख्ये, तुकाराम  गोवेकर, आदींच्या हस्ते दिप प्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात झाली. 

सुरवातीला शंकर गावकर यांनी मालवणी मुलखातले गा-हाणे घालून देवांची आराधना केली. त्यानंतर विलास नाईक यांनी केलेल्या प्रस्तावीकात स्नेहमेळाव्याच्या सर्व बाबींचा आढावा घेतला. संजय म्हापसेकर यांनी सूत्र संचालन केले.  तसेच दिवंगत वर्गमित्र राजू राणे, स्मीता मांजरेकर, राजू नाचणोलकर, जयंत कुलकर्णी तसेच दिवंगत प्राध्यापक व पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात देवाज्ञा झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उत्स्फुर्तपणे अनेकांनी गाणी, विडंबन गिते, विनोद, यांनी वातारवण हलक - फुलक ठेवण्सांयात मदत झाली. 

या स्नेहमेळाव्याचे स्थानीक आयोजक आनंद परुळेकर, उमेश बिरोडकर, मंगेश साळगांवकर, विठ्ठल आजगांवकर, विलास नाईक, संजय म्हापसेकर, दादा भाईप, तुषार शींदे यांचा दुरवरुन आलेल्या मित्रांनी खास सत्कार केला. या स्नेह मेळाव्यात स्वागत आणि आभार  सुधाकर राणे यांनी मानले आणि या कार्मायक्नरमाची सांगता झाली.