चाकरमान्यांना रिक्षा भाडे नाकारताय..?

Edited by:
Published on: September 14, 2023 17:33 PM
views 1501  views

कुडाळ :  सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आनंदाचा सण असलेल्या गणेशोत्सव काळात चाकरमानी मोठया प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत असतात. आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या रेल्वेच बुकिंग फुल झाल आहे, एसटी बसच्या ही फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत, खाजगी बस जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र या चाकरमान्याना घरी जाण्यासाठी रिक्षा हा पर्याय निवडत असतात.

रिक्षाच्या माध्यमातून आपल्या घरी जाणाऱ्या चाकर माण्यांची संख्या जास्त आहे. तर दुसरीकडे आपलं गावाकडील घर लांब आहे  रिक्षा जाऊ शकत नाही हेही सांगण्याचं प्रमाण रिक्षावाल्यांमध्ये जास्त आहे. रिक्षा चालकाकडून भाडे नाकारण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र याला चाप बसावा म्हणून  सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाणे परी पत्रक जारी करत मुंबई वरून गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर रिक्षा चालकाकडून जादा भाडे आकारणे व रिक्षा भाडे नाकारणे असे प्रकार घडल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.