भयमुक्त करण्यासाठी पुनर्वसन हाच पर्याय - बाबुराव धुरी

सरकार लक्ष देत नसेल तर आंदोलन उभारण्याचा धुरी यांचा निर्धार
Edited by: संदीप देसाई
Published on: October 15, 2022 20:35 PM
views 647  views

दोडामार्ग : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झंझावाती सैनिक म्हणजे बाबूराव धुरी..रात्री अपरात्री कोणतेही दुर्घटना घडल्यास हक्काने ज्याला हाक मारावी ती व्यक्ती म्हणजे बाबुराव धुरी. आज ही व्यक्ती खऱ्या अर्थाने दोडामार्ग तालुक्यातील  केर भेकुर्लीतील धनगरवाडीसाठी मोठा आधार बनली आहे.

पट्टेरी वाघ आणि बिबटया यांची रोजचीच दहशत . एक दोन नव्हे तर महिना दोन महिन्यात अनेक पशु वाघाच्या भक्षस्थानी गेले. घराच्या शेजारी ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत हल्ले होण्याचे प्रकार घडत गेले. यातून मुक्ती मिळावी यासाठी ग्रामस्थ बाबुराव धुरी यांना हक्काने हाक देतात धुरी त्यांच्या पाठीशी राहतात, पंचनामा होतोही पण यावर कायम स्वरूपी इलाज व्हावा आणि वन्य प्राणी दहशतीचा रात्रीचा अनुभव घेणाऱ्या त्या लोकांना आधार द्यावा, ते ग्रामस्थ आपले आहेत तिथे जाणे अनुभवणे आपले कर्तव्य असल्याचे मानत स्वतः धुरी मध्यरात्री या गावातील वाडीत पोहचले. ग्रामस्थांच्या व्यथा वेळोवेळी धुरी यांनी ऐकून घेतल्या आहेत. आता या ग्रामस्थांना भयमुक्त करण्याचा संकल्प श्री. धुरी यांनी केला आहे. आणि त्यासाठी ते स्वतः या वाडीत पोहचून तेथील धनगर बांधवांची आस्थेने काळजी घेत आहेत.


पुनर्वसन हाच पर्याय | त्यासाठी आंदोलन उभारणार - धुरी

आपण जी परिस्थिती पाहिली ती खरंच भयावह आहे.. डोंगर भाग, हिश्र श्वापदे, घर गोठे येथे होणारे वन्यप्राणी हल्ले, अंतर्गत रस्ते पाहता या ग्रामस्थांना भयमुक्त केले पाहिजे असे धुरी म्हणाले. शिवाय जर या ग्रामस्थांना भयमुक्त करायचे असेल तर या ग्रामस्थांचे शासकीय जमिनीत पुनर्वसन करायला हवे याकडे आपण लक्ष वेधणार शिवाय जर सरकार लक्ष देत नसेल तर आंदोलन उभारणार असल्याचेही धुरी यांनी स्पष्ट केले आहे.