अर्चना फाऊंडेशनकडून विश्वकर्मा योजनेसह अन्य योजनांचं नोंदणी अभियान

Edited by: विनायक गावस
Published on: December 11, 2023 13:22 PM
views 108  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अर्चना फाऊंडेशनच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अर्चना फाऊंडेशनच्यावतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेसह विविध २८ योजनांच्या अंतर्गत नागरिकांसाठी विशेष नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळून अनेक नागरिकांनी नावनोंदणी केली.

यातील पात्र लाभार्थ्यांना आज लाभाचे वाटप करण्यात आले. दाभोली येथे पात्र शेतकरी व कामगारांना राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आपले  आशीर्वाद माझ्यासाठी लाखमोलाचे असून माझ्या हातून हे सेवाकार्य अखंड घडावे हीच मनोकामना अशी भावना अर्चना घारेंनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष संजीव लिंगवत, वेंगुर्ला शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, कृषी सेल तालुकाध्यक्ष बाबा टेमकर, बबन पडवळ, कुणाल बिडीये, विश्राम कोचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.