मेडिकल कॉलेज व जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या हेळसांडीबाबत खा. राऊत घेणार आढावा बैठक...!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 29, 2023 12:57 PM
views 219  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय येथे रुग्णाची हेळसांड होत असल्याबाबत खासदार विनायक राऊत यांच्याकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी येत आहेत.

या संदर्भात  खा. विनायक राऊत यांनी शनिवार दि. 30 सप्टेंबरला सकाळी 11. 30 वाजता   सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालयाच्या डीन व जिल्हा शल्यचिकित्सक यांची आढावा बैठक आयोजित केली आहे.