
सावंतवाडी : राजगुरू पाणंद सावंतवाडीच्या दुरुस्तीबाबत राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा अँड. सायली दुभाषी यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच लक्ष वेधले. जावडेकर कार्यालयात उपस्थित नसल्याने हे पत्र न.प.च्या आसावरी शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल. सावंतवाडी शहरातील सालईवाडा राजगुरू पाणंद (सामंत गॅरेज) जवळ ही पाणंद दुरुस्ती करून सुमारे ३० वर्षे झाली असुन त्यानंतर या पाणंदीची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची डागडुजी अथवा देखभाल केली गेलेली नाही. त्यामुळे या पाणंदीवर घुस, उंदिर अशा उपद्रवी प्राण्यांनी पोखरल्यामुळे ही पाणंद रहदारीसाठी धोकादायक बनली आहे. त्यामुळे या भागातील आम्हा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आपण वेळीच लक्ष घालून पाणंदीची पाहणी करून योग्य ती दुरूस्ती करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी अँड. सायली दुभाषी यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, उपाध्यक्ष बाबल्या दुभाषी, राकेश नेवगी, फिरोज खान, रेहाना खान, झहीरा खान, महंमद खान, मनोहर सामंत, प्रिसिला फर्नांडिस, विनोद नाटेकर आदी उपस्थित होते.