कोकणसाद LIVE च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सर्वोत्कृष्ट मालवणी वृत्त निवेदिका पुरस्काराने जुईली पांगम यांचा रिल्स मालवणीने केलाय सन्मान
Edited by: ब्युरो
Published on: April 07, 2023 11:35 AM
views 176  views
हायलाइट
मालवणी बुलेटीनची घेतली दखल

कुडाळ : मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेला सातासमुद्रापार पोहचवल. त्यांचा हा वारसा कोकणचं नंबर 1 महाचॅॅनेल कोकणसाद LIVE वेळोवेळी जपण्याचा प्रयत्न करते. यातूनचं कोकणसाद LIVE ने पुढंच पाऊल टाकत जगातलं पहिलं मालवणी बुलेटीन सुरु केलं. याच कार्याची दखल घेत रील्स मालवणी या टीमच्यावतीने मालवणी भाषा दिनाच्या निमित्ताने कोकणसाद LIVE चा विशेष सन्मान करण्यात आला. कोकणसाद LIVE च्या न्यूज अँकर जुईली पांगम यांना सर्वोत्कृष्ट मालवणी वृत्तनिवेदिका या अॅॅवोर्डने गौरविण्यात आलं. 


कोकणचं नं. १ महाचॅॅनेल कोकणसाद LIVE नेहमीच कोकणवासीयांची अपेक्षापूर्ती करत असते. आजवर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असे अनेक उपक्रम राबवत असताना आता मालवणी बोलीतून बातम्या द्याव्यात, मालवणी बुलेटीन असाव अशा अपेक्षा व्यक्त होत होत्या. दर्शकांची ही मागणी लक्षात कोकणसाद LIVE ने हे देखील शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला. 24 नोव्हेंबर 2022 ला देवदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पहिलं मालवणी बुलेटीन सुरु केलं. अलीकडच्या काळात रील्स, सिरीयल्स चित्रपटामध्ये मालवणी भाषेचा वापर करण्याचा ट्रेंडच सुरु होता. मात्र अशा पद्धतीने माध्यम क्षेत्रात मालवणी बुलेटीनचा हा पहिलाच प्रयोग ठरला.


पहिल्याच बुलेटीनला कोकणवासियांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. केवळ मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातील कोकणवासियांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इतकंच नव्हे तर परदेशात असणाऱ्या आमच्या कोकणवासियांनी याच कौतुक केलं. परदेशात बसून या माध्यमातून गावाशी जोडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे हे जगातलं पहिलं मालवणी बुलेटीन ठरलं. जगभरातल्या कोकणवासीयांच्या पसंतीस उतरलं. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या विविध नाटकांच्या प्रयोगातून मालवणी भाषेला स्थान मिळवून दिलं. अख्खं आयुष्य त्यांनी मालवणी भाषेच्या सन्मानासाठी वेचलं. त्याचमुळे आज कोकणी माणूस अभिमानाने आपलं मालवणीपण मिरवतोय. त्यांच्याच पावलावर पाउल टाकत आमच्या नेटवर्कच्या माध्यमातून मालवणी भाषेला सातासमुद्रापार पोहचावण्याचा आमचा प्रयत्न होता. 


आमच्या कोकणवासियांनी, मालवणीवर प्रेम असलेल्या प्रत्येकाने या आमच्या उपक्रमाचं स्वागत केलं. दर रविवारी प्रसारित होणाऱ्या आमच्या या मालवणी बुलेटीनला तेवढाच प्रतिसाद असतो. याची दखल घेत रील्स मालवणी टीमने कोकणसाद LIVE चा विशेष सन्मान केला.


रील्स मालवणी पुरस्कृत  मालवणी अॅॅवोर्ड शो मध्ये कोकणसाद LIVE च्या न्यूज अँकर जुईली पांगम यांना सर्वोत्कृष्ट मालवणी वृत्तनिवेदिका या अॅॅवोर्डने गौरविण्यात आलं.  या सन्मानामुळे कोकणसादLIVE  च्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय.