रेडीत रामसिंग राणेंनी स्वीकारला पदभार

उपसरपंचपदी नमिता नागोळकर बहुमतांनी विजयी
Edited by: दीपेश परब
Published on: December 30, 2022 10:12 AM
views 281  views

वेंगुर्ला : रेडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे रामसिंग राणे हे विजयी झाले. त्यांनी २९ डिसेंबर रोजी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत एकूण १४ मतांपैकी १० मत घेऊन बहुमतांनी भाजपच्या नमिता नागोळकर विजयी झाल्या. 

यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सोनाली कलच्यावकर, सागर रेडकर, तुळशीदास भगत, शमिका नाईक, प्रज्ञा राऊळ, मानसी राणे, लक्ष्मीकांत भिसे, विनोद राणे यांनी आपले बहुमोल असे मत घालून त्यांना विजयी केले.

यावेळी सरपंच रामसिंग राणे व उपसरपंच नमिता नागोळकर यांना पुष्पगुच्छ व हार घालून सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारणी सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जि.प. माजी सदस्य प्रितेश राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, वेंगुर्ला तालुका भाजप सरचिटणीस प्रशांत खानोलकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, विजय बागकर, शिरोडा ग्रा प नवनिर्वाचित सदस्य मयुरेश शिरोडकर, माजी ग्रा प सदस्य राहुल गावडे, माजी सरपंच मनोज उगवेकर, ग्राम कमिटी उपाध्यक्ष ओकांर कोनाडकर, भाजप ज्येष्ठ पदाधिकारी अरुण राणे, रेडी  ग्रामस्थ प्रभाकर राऊळ, गोपाळ राऊळ, गोविंद गडेकर, उल्हास नरसुले, शेखर वारखंडकर, स्वप्निल राणे, संदेश राणे, शेखर सावंत, तुकाराम सावंत, सतिश राणे, चेतन पिळणकर, छोटु राणे, प्रसाद राऊळ, अंकुश राणे, मंगेश राणे, संजय कांबळी, दिपक राणे, संजय नागोळकर, मधुरा नाईक, मनाली करलकर, शलाका कांबळी, सानिका कांबळी, साक्षी कांबळी, अक्षता नागोळकर, नीता कृष्णाजी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.