
वेंगुर्ले : नवसाला पावणारी रेडी गावची ग्रामदैवत व कोकणची अंबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू श्री देवी माऊली रेडीचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ (कार्तिक अमावास्या) रोजी संपन्न होणार आहे.
सकाळी ६.०० वाजता श्री देवी व परिवार देवतांची पुजा, सकाळी ८.०० वाजता उत्सव मुर्ती सजावट, तद़नंतर ओटी भरणे व नवस फेडणे कार्यक्रम प्रारंभ, सकाळी ११.०० नंतर मंदिराच्या सभामंडपात देवीच्या साड्यांचा लिलाव, रात्रौं ११.३० वा. संबंधितांना तेल वाटप करणे व पुराण वाचन करणे, रात्रौं ११.४५ वा. देवी समोरील कुवाळा ज्योतीचा विधी. रात्रौं ठिक १२.०० वाजता आकर्षक फटाकांच्या आतषबाजीत श्रीे देवीची पालखि प्रदक्षीणा त़दनंतर रात्रौ वालावलकर दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकानी या उत्सवाचा लाभ घ्यावा ही विनंती. खास आकर्षक : फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई.