
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथील प्रसिध्द व जागृत देवस्थान श्री द्विभुज गजानन देवस्थानचा वाढदिवस सोहळा आज उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्त जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, बाबा राऊत, नवनीत परब, सागर राणे, दशरथ राणे, आबा राणे, नाना पेडणेकर, लक्ष्मीकांत राणे यांच्या मार्फत श्री गजानन चरणी ४९ किलो बालुशा या पदार्थाचा प्रसाद अर्पण करण्यात आला.
३५ व्या वाढदिवस सोहळ्या पासून गेली १५ वर्ष सातत्याने या मंडळींकडून श्री गजानन चरणी ही सेवा केली जाते. यावेळी दादा राणे, श्री गजानन देवस्थानचे विनायक कांबळी आदी उपस्थित होते.