
सिंधुदुर्गनगरी : मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून विजा चमकण्याची तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
तसेच या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.