
कुडाळ : यशस्वी अकॅडमी फॉर स्किल, पुणे यांच्या मार्फत नियुक्त प्रशिक्षणार्थी उमेदवारांना नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत समायोजन करून घेण्यात यावे अशी मागणी यशस्वी अकॅडमी फॉर स्किलच्या जिल्ह्यातील डाटा एन्ट्री ऑपरेटरांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे कुडाळ भाजप कार्यालय येथे केली आहे
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल, पुणे यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ग्रामीण रूणालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्र व शहरी आरोग्य केंद्र येथे ४००० (सिंधुदुर्ग ६७) डाटा एंट्री ऑपरेटर भरण्यात आले आहेत.प्रशिक्षित सर्व डाटा एंट्री ऑपरेटर हे पदवीधर व संगणक ज्ञान आत्मसात केलेले आहेत. संबंधीत डाटा एंट्री ऑपरेटर यांना एजन्सी मार्फत नियुक्ती न देता राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मंजूर असलेल्या पदांवर समायोजन करून नियुक्त करावे. यासाठी आपल्या स्तरावरून महाराष्ट्र राज्य शासनास शिफारस देण्यात यावी.
या प्रश्नाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत सेवेत समायोजन करण्यात यावे अशी मागणी डाटा ऑपरेटर ऐश्वर्या विद्याधर कदम, संपदा महादेव जाधव, भूषण सिताराम मसुरकर, स्वरूप तुकाराम नारकर, धनंजय पवार यांनी केली आहे.