यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत 'Reading Inspiration Day' मोठ्या उत्साहात

Edited by: विनायक गावस
Published on: October 17, 2023 12:50 PM
views 200  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 'Reading Inspiration Day' आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासकीय समन्वयक सुनेत्रा फाटक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम  यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूीवर कॉलेजच्या लायब्ररी विभागातर्फे "Reading Inspiration - Reel Making" ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

यामध्ये  सुयोग देसाई व संदेश बेळेकर प्रथम, नारायण डीगणेकर द्वितीय व मिथील जाधव यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. शिवानी रावुळ व तानिया भिसे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

अवांतर वाचनाचे महत्व वाचन ही एक कला आहे, जी आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवू शकते. वाचनामुळे आपल्याला ज्ञान आणि प्रेरणा मिळते. ते आपल्याला स्मार्ट बनवते. याविषयी प्राचार्य डॉ. बाणे सर यांनी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी उपप्राचार्य जी.ए. भोसले,सबिना रॉय सर्व विभाग प्रमुख,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व डिग्री व डिप्लोमा कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल मानसी कुडतरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास ग्रंथालय सल्लागार समितीचे मोलाचे सहकार्य लाभले.