
सावंतवाडी : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा सावंतवाडीत झाला. शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्यात होती.
यावेळी बोलताना ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. रविंद्र फाटक यांनी देवगड मतदार संघातून आमदारकी लढवली होती. निवडून देखील येणार होते. मात्र, थोडक्या मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. रविंद्र फाटक 'ती' चुक आता दुरुस्त करतील, असं मत सुधीर सावंत यांनी व्यक्त केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करूयात, असं मत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.