
मालवण : कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण तालुका भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक दैवेज्ञ भवन येथे सुरु आहे.
भाजपाचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोकणात उबाठा गटाचा सुफडासाफ झाला आहे. या निवडणुकीत सुद्धा त्यांचा दारूण पराभव करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी कोकणात भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.