पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते 'सिंधुदुर्ग महासंस्कृती' महोत्सवाचा शुभारंभ !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 07, 2024 05:42 AM
views 92  views

सावंतवाडी : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणार सरकार हे जनसामान्यांच सरकार आहे‌. महाराष्ट्र हा लोककला व सण, उत्सवांना महत्व देणारा आहे‌. मागच्या सरकारन लावलेले निर्बंध उठवण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारनं केलं. लोकांना खऱ्या अर्थानं आनंद देण्याच काम आमचं सरकार करत आहे. समाजातील मानसिक तणाव दुर करण्यासाठी हे सरकार कार्यरत आहेत असं प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केल. सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवात ते बोलत होते. 

सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व प्रतिमापुजनान या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच जिल्हाधिकारी यांनी स्वागत केल. 

याप्रसंगी मनोगतात आ.नितेश राणे म्हणाले, कलेची मेजवानी या निमित्ताने जिल्ह्याला बघायला मिळणार आहे. एक चांगला महोत्सव आयोजित केला आहे. सिंधुदुर्गवासिय उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला देतील हा माझा विश्वास आहे‌. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच अभिनंदन करावे तेवढं थोडे आहे. नुकतीच 'येड्यांची जत्रा' जिल्ह्यात झाली. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही. पण, या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाला लोक प्रतिसाद देतील असं विधान  करत उद्धव ठाकरेंच नाव न घेता राणेंनी टोला हाणला. 

तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रात घेतले‌. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणली. आमचं सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे‌. मराठी भाषा, मराठी संस्कृतीची जपणूक करण्याच काम हे सरकार करत आहे‌‌. सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमास मराठी कलाकारांची उपस्थिती असणार आहे‌. अनेक दर्जेदार कार्यक्रम तुम्हाला पहायला मिळणार आहेत‌. जिल्हाधिकारी यांनी या सोहळ्यासाठी मेहनत घेतली आहे. सावंतवाडीत आपण हा कार्यक्रम घेतला याबद्दल आपले आभार मानतो. येत्या १० फेब्रुवारीला ५१ व राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन होत आहे‌. पुढच्या काळात सावंतवाडी हे पर्यटनदृष्ट्या आकर्षक शहर असेल, दुबईच्या धर्तीवर फाऊंटन मोती तलाव येथे होईल. तर  सावंतवाडी टर्मिनसच्या रस्त्यासाठी पालकमंत्री यांनी निधी दिला. सुशोभिकरण त्या ठिकाणी होत आहे. तर ८ कोटी रुपये टर्मिनस व रेस्टॉरंटसाठी रत्नसिंधूतून दिले आहेत‌‌. आगामी काळात हे रेल्वे टर्मिनस पुर्ण होईल, कोकणच्या विकासाला गती मिळेल‌. आमच्या मतदार संघाचा सहा महिन्यांत कायापालट झालेला असेल असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. 

अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणार सरकार हे जनसामान्यांच सरकार आहे‌. महाराष्ट्र हा लोककला व सण, उत्सवांना महत्व देणारा आहे‌. येथील लोक उत्साही आहे. आपली संस्कृती जपताना ते पहायला मिळतात. इथल्या रूढी, परंपरा जपण्याच काम पिढ्यानपिढ्या सुरु आहे. अशा महोत्सवांच्या माध्यमातून या गोष्टींना प्रोत्साहन मिळत. कोरोनासह मध्यल्या काळात सांस्कृतिक चळवळीवर परिणाम झाला होता. मानसिक तणाक समाजात होता‌. परंतु, नवं सरकार महाराष्ट्रात आलं अन् लोकांच्या मनातील गोष्टी होऊ लागल्या. सर्व सण, उत्सवांवरील निर्बंध उठवले गेले. सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मुर्तींवर निर्बंध टाकण्याच काम मागच्या सरकारन केलं. हे निर्बंध उठवण्याच काम शिंदे-फडणवीस सरकारनं केलं. खऱ्या अर्थानं आनंद देण्याच काम आमचं सरकार करत आहे. मैदानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमातून हे कार्य केलं जातं आहे‌. समाजातील मानसिक तणाव दुर करण्यासाठी हे सरकार कार्यरत आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. सांस्कृतिक मेळावा उभं करण्याच काम प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिलह्ज्ञात होत आहे. सिंधुदुर्ग हा कलावंतांचा जिल्हा आहे. दशावतारा सारख्या कला या जिल्ह्यात जपल्या जात आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी मानले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले, विशाल खत्री, माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.