
सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण हे 22 ते 23 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व ओरोस जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस समिती कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ओरोसला उपस्थिती राहणार आहेत. दुपारी 3 वाजता केसरी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. तर दुपारी. 4.30 वाजता केसरी येथे आगमन व राखीव. शनिवार 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजता केसरी येथून गोवाकडे प्रयाण करणार आहे.