पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा असा आहे सिंधुदुर्ग दौरा !

Edited by: ब्युरो
Published on: November 30, 2023 20:26 PM
views 252  views

सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शुक्रवार दि. 1 व 2 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 1 डिसेंबर 2023  रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ (मोपा), गोवा येथे आगमन व केसरी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता केसरी येथे आगमन व राखीव.  दुपारी 1.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, येथे आगमन व भारतीय नौसेना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात आढावा. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गगरी. सायं. 5.30 वाजता सिंधुदुर्ग येथून केसरी ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सायं. 6.30 वाजता केसरी येथे आगमन व राखीव.

शनिवार दि. 2 डिसेंबर 2023  रोजी सकाळी 8.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून मनोहर विमानतळ, मोपा (गोवा) कडे प्रयाण.