पालकमंत्री रविंद्र चव्हाण जिल्हा दौऱ्यावर !

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 13, 2024 06:59 AM
views 254  views

सिंधुदुर्गनगरी  : : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 13 जुलै 2024 रोजी रात्री 11.45 वाजता केसरी ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. रविवार दि. 14 जुलै 2024 रोजी राखीव.  सोमवार दि. 15 जुलै 2024 रोजी राखीव. 

मंगळवार दि. 16 जुलै 2024 रोजी  सकाळी 9.30 वाजता केसरी येथून ओरस, जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ : समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस जि.सिंधुदुर्ग. दुपारी 2 वाजता राखीव. दुपारी 3 वाजता डोंगरी विकास समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ: समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस, जि. सिंधुदुर्ग. दुपारी 3.30 वाजता सिंधुदुर्ग येथून मोपा गोवाकडे प्रयाण.