
सावंतवाडी : विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांची नसून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची आहे. महायुतीला एक एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे विरोधकांच्या भुलथापांना फसू नका असे आवाहन भाजपचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उद्देशून केले.लोकसभेपेक्षा या निवडणुकीत दीपक केसरकर जास्त मताधिक्य मिळवून विजयी झाले पाहिजेत. महायुतीचा झेंडा महाराष्ट्रातील पहिल्या मतदारसंघातून फडकला पाहिजे. महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ भाजप पदाधिकारी बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते.
यावेळी उमेदवार दीपक केसरकर,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवराज लखमराजे भोसले, अतुल काळसेकर, महेश सारंग, मनोज नाईक, राजेंद्र म्हापसेकर मंदार कल्याणकर, चेतन चव्हाण, सुधीर दळवी आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शत प्रतिशत भाजप म्हणून बांधणी केली. बुथ व शक्ती केंद्र माध्यमातून मतदारसंघात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले. भाजपचे सर्व वरिष्ठ मान्यवरांनी बळ दिले. भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाले पण कार्यकर्ता ही संपत्ती आहे. त्यामुळे ते आमच्या सोबत राहीले. जे आमच्या सोबत नव्हते ते राहिले नाही. अनेकजण भाजपचे निष्ठावंत आहेत त्यांना काही मिळाले नाही तरीही ते आमच्या सोबत राहीले आहेत. मलाही सुरुवातीला काही मिळाले नाही. संघटनेत १४ वर्ष पक्षात एकही पद मिळाले नाही पण नितीन गडकरी व विनोद तावडे सांगायचे ते काम करत राहीलो. भाजप मध्ये मी रवी होतो,पण मला रवींद्र केव्हा केलं ते कळलं नाही. पक्ष फार मोठा आहे. भरपूर पक्षाकडून शिकता आले. त्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने जपून वागतो. पक्ष प्रेमामुळेच सर्व जण एकत्र महायुतीच्या प्रचाराला उपस्थित आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले, शिवसेनेने उठाव केला. तेव्हा प्रवक्ता म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून दिपक केसरकर यांचे नाव समोर आले. केसरकर यांनी प्रवक्ता म्हणून केलेली कामगिरी जाणीव ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केसरकर यांच्यासाठी मदत केली. चव्हाण म्हणाले, भाजपचा परिवार समजून काम सुरू केले. मला राज्यात प्रचाराला जायची संधी उपलब्ध झाली. ही निवडणूक दिपक केसरकर यांची नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. उध्दव ठाकरे काय आरोप करत आहेत हे जाणून घ्या. शणभंगूर आहे,अळवाच्या पाण्यासारखे आहे. प्रत्येक निवडणुक आपण सर्वांनी लढलो, स्वार्थी लोक प्रवाहाच्या बाहेर फेकली गेली. प्रवाहाच्या धारेवर कोणीही टिकणार नाही. सर्वांनी ताकद लावून महायुतीचा उमेदवार विजयी होणे आवश्यक आहे. महायुतीचा विजयी होवून झेंडा फडकला पाहिजे. कोणाच्याही भुलथापांना फसू नका. लोकसभेपेक्षा जास्त मतदान झाले पाहिजे. स्वार्थापोटी बाहेर गेलेल्यांना संघटनेची ताकद दाखवून देऊया.
महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर म्हणाले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पक्षशिस्त बाळगून प्रचारात उतरणार आहोत. समोरचा उमेदवार शेतकरी व लोकांची दिशाभूल करत आहे. पक्ष संघटनेतील लहानात लहान कार्यकर्ता संघटना बांधणी करण्यावर भर देत आहे. मी २४५२ कोटी रुपयांची कामे करूनही निष्क्रिय असल्याचे म्हणतोय. पंचतारांकित हॉटेल प्रकल्प सुरू केला दुसऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी तेथील स्थानिक लोकांना भडविण्यात आले. शासनाने जमीन संपादन केली तरीही त्यांना ६० कोटी रुपये अलाहीदा भरपाई दिली. माझ्या वर मुंबई पालकमंत्री जबाबदारी आणि अन्य जबाबदाराऱ्या होत्या त्यामुळे वेळोवेळी तुमची भेट होवू शकली नाही. शिक्षण व मराठी भाषा मंत्रालय लोकप्रिय केले. टुडे आणि टुमारो मधील फरक पडत नाही तो मात्र घोषणाबाजी करत आहे. पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी आहेत तर दुसरे मनीलाॅड्रीग खटला सुरू आहे. दोन वेळा माझ्या विरोधात उभे राहिले पडले पण माझ्या विरोधात जयघोष करीत आहे. बंडखोरावर कोणावर अन्याय झाला नाही. राणे आणि माझा वैचारिक संघर्ष झाला होता. पण मी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या विजयासाठी पुढाकार घेतला. महायुतीच्या विरोधात उभे राहिलेले उमेदवारांना संघटनेची ताकद दाखवून देऊया. लोकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सतत साकारत्मक प्रयत्न केले. शेतकरी व मच्छीमार यांना आर्थिक बळ दिले. मराठी भाषा भवन उभारण्यासाठी प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना सतत भेटून मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मुंबई पालकमंत्री म्हणून कायापालट होईल असा प्रयत्न केला. मी मुंबईत पालकमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली आहे. माझ्या सांगण्यावरून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलले ते बोलणं व्हायरल केले तर दुसऱ्याला हरण्याची सवय आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले.