पालकमंत्री रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 23, 2024 12:43 PM
views 163  views

सिंधुदुर्गनगरी :  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे  दि. 25 ते 27 सप्टेंबर 2024  रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

  बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी  सकाळी 9.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून ओरोस जि.सिंधुदुर्गकेडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता  "जनता दरबार" (कणकवली – देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघ) कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस,जि. सिंधुदुर्ग.  दुपारी 3 वाजता ओरोस येथून केसरी ता. सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव . 

 गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून ओरोसकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता "जनता दरबार" (कुडाळ – मालवण विधानसभा मतदारासंघ) कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस सिंधुदुर्ग. दुपारी 2.30 वाजता  ओरस येथून सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता सावंतवाडी येथे आगमन व सावंतवाडी तालुकयातील 11 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मोफत रुफ टॉप सोलार वीज निर्मिती संच साहित्य वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- काझी शहाबुद्दीन हॉल सावंतवाडी. सायं. 5 वाजता रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- सावंतवाडी. सायं. 6.30 वाजता सावंतवाडी येथून मोटारीने केसरी ता.सावंतवाडीकडे प्रयाण सायं. 7.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथे आगमन व राखीव.  

शुक्रवार दिनांक 27 सप्टेंब 2024 रोजी सकाळी 8.45 वाजता केसरी येथून सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता  सावंतवाडी येथे आगमन व "ग्रँड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक" लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- बँक्वेट हॉल, राजवाडा ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग. सकाळी 10 वाजता सावंतवाडी येथून ओरोसकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता "जनता दरबार" (सावंतवाडी- वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघ) कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जिल्हा नियोजन समिती सभागृह ओरोस सिंधुदुर्ग. दुपारी 3 ओरोस सिंधुदुर्ग येथून मोपा, विमानतळ गोवाकडे प्रयाण.