
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा होणार आहे.
देवगड/ पडेल मंडलात20 सप्टेंबर 2024 पडेल हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर आयोजन केले आहे. तसेच देवगड ग्रामीण रुग्णालय फळे वाटप तसेच 22 सप्टेंबर 2024 कणकवली शहर / ग्रामीण मंडलाच्या वतीने कणकवली येथे रक्तदान शिबिर आणि वैभववाडी मंडलाचे वैभववाडी येथे 25 सप्टेंबर 2024 रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी देवगड येथील आयोजन राजेंद्र शेट्ये आणि बंड्या नारकर कणकवली येथील आयोजन मिलिंद मेस्त्री आणि दिलीप तळेकर तसेच वैभववाडी येथील सुधीर नकाशे हे विविध कार्यक्रमांचे नियोजन करत आहेत.
या कार्यक्रमास रक्तदाते, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस तसेच कणकवली विधानसभा संयोजक संदीप साटम यांनी केले आहे.