
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णकल्याण नियामक समितीवर अशासकीय संस्था सदस्य म्हणून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवींद्र विष्णू जाधव यांची निवड करण्यात आली. सामाजिक व आरोग्य क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या व्यक्तींची निवड झाल्याने प्रशासनाला देखील चांगल्याप्रकारे सहकार्य होऊन आरोग्य व्यवस्थेची प्रगती होईल असे वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सांगितले.
यामुळे सावंतवाडी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य, सामाजिक क्षेत्रात रवी जाधव कार्यरत आहेत. आरोग्य यंत्रणेला त्यांचा मोठा आधार आहे. गोरगरीब, वंचित, निराधारांना सामाजिक बांधिलकीतून सेवा देण्याच काम श्री. जाधव करत असून या कामाची दखल घेऊन रुग्णकल्याण नियामक समिती सदस्य पदी त्यांची निवड केली आहे.