रवीना गवस हिला प्राणिशास्त्र विषयात पीएचडी

Edited by: विनायक गांवस
Published on: June 28, 2025 19:03 PM
views 80  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील अधिव्याख्याता रविना चंद्रशेखर गवस हीने  मुंबई विद्यापीठाची प्राणीशास्त्रातील पी.एच.डी मिळवली. 'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी मासेमारीवर मानवी गतिविधि आणि त्याचा परिणाम यांचा अभ्यास ' या विषयावर तिने मुंबई विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. 

तिला या संशोधनासाठी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे कार्यकारणी सदस्य जयप्रकाश सावंत, संस्थेचे संचालक प्रा. डी.टी देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, वरिष्ठ प्राध्यापक एम ए ठाकूर, आय क्यु. ए सी समन्वयक डॉ.बी एन हिरामणी, प्राणीशास्र विभागाचे  डाॅ. जी एस मर्गज, रसायनशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. डी बी शिंदे, प्राणिशास्राच्या डाॅ. शलाका वालावलकर आदी उपस्थित होते. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन शुभदादेवी भोंसले तसेच संस्थेचे  ईतर सदस्य यांनी तीचे अभिनंदन केले आहे.