
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र पुनर्बाधणीचं काम आता पूर्ण झालं आहे. या नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिनाचा मुहूर्त साधत रविवारी २७ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
हे सांस्कृतिक केंद्र तब्बल वीस वर्षांनी रंगकर्मी व रसिक प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होत आहे. २७ जुलैपासून रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. साडे अकरा कोटी रूपये खर्चुन सर्व सोयीसुविधांयुक्त सुसज्ज अशा नाट्यगृहाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. तब्बल १९ वर्षानंतर नाट्यगृहाचा 'पडदा उघडणार आहे. यामुळे नाट्यरसिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी खेड नगर परिषदेकडून सुरू आहे.