
मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निसर्ग मंडळ विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या 169 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी संस्थेचे संचालक श्री. आदेश मर्चंडे, श्री. वैभव कोकाटे, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, महाविद्यालयाचे एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण डॉ. संगीता घाडगे, डॉ. महेश कुलकर्णी, निसर्ग मंडळ समन्वयक डॉ. शैलेश भैसारे आदी मान्यवर उपिस्थत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुंबई विद्यापीठ गीताने करण्यात आली. तत्पूर्वी प्रा. संदीप निर्वाण यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी सांगितले मुंबई विद्यापीठाला एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. सुरूवातीपासूनच एक दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून नावाजलेले आहे. आजतागायत तो वारसा विद्यापीठाने कायम जपला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, महाविद्यालयामध्ये विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षसंवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. महाविद्यालयीन युवकांनी यात सहभाग घेऊन त्यांनी स्वतःपासून या राष्ट्रीय कार्याची सुरुवात करावी. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ‘एक पेड माॅ के नाम’ या उपक्रमा अंतर्गत स्वयंसेवकांना रोपे वाटप करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संचालक श्री. आदेश मर्चंडे, श्री. वैभव कोकाटे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये व इतर मान्यवरांच्या यांचे हस्ते महाविद्यालय परिसरात बकुळ, जांभूळ, कोकम, चिंच, गुलमोहर आदी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. शैलेश भैसारे यांनी मानले.