
चिपळूण : भाकर सेवा संस्थेमार्फत रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे बालकांच्या न्याय विषयक जनजागृती कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम बालविवाह, बालकामगार, बाल तस्करी या विषयास अनुसरून भाकर संस्थेमार्फत जनजागृतीसाठी रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रेल्वे स्थानकामध्ये उपस्थित सर्व प्रवासी यांना बालकांचे हक्क व बाल न्याय याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच महिलांचे कायदे व हक्क याविषयी माहिती देण्यात आली यामध्ये विशेषतः बालकांसाठी सुरक्षिते करिता १०९८ हा चाईल्ड लाईन हेल्पलाइन नंबर व महिलांसाठी १८१, पोलीस सहायता नंबर ११२ या विषयक माहिती देण्यात आले. सदरील कार्यक्रम हा प्लॅटफॉर्म, प्रवासी विश्रांती कक्ष आणि रेल्वे मध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी रत्नागिरी रेल्वे स्थानक मधील स्थानक प्रमुख एम एन रॉय RPF इन्स्पेक्टर श्री सतीश विधाते, वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक श्रीमती शुभदा देसाई, ASC सहाय्यक सुरक्षा आयुक्त गोकुळ सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक चौहान, भाकर संस्थेचे संस्थापक श्री देवेंद्र पाटील,सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक श्रीमती अश्विनी मोरे, महिला व मुलांकरिता विशेष सहाय्य कक्ष चे समुपदेशक श्री पवनकुमार मोरे व श्रीमती पूर्वा सावंत, महात्मा फुले समाजसेवा मंडळ रत्नागिरी तालुका समन्वयक श्रीमती निकिता कांबळे व कोमल सोलीम, भाकर संस्था कार्यकर्ती श्रीमती शीतल धनावडे आणि रेल्वे स्थानक येथील सर्व प्रशासकीय वर्ग इत्यादी उपस्थित होते.