रत्नागिरीत १ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

Edited by: मनोज पवार
Published on: July 17, 2025 18:55 PM
views 103  views

रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १८ जुलै २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते १ ऑगस्ट २०२५ रोजी २४.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी हा आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यात विविध संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेतले जात असून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६६) चे अपूर्ण काम, तसेच अन्य मागण्यांच्या पार्श्वभूमीवर निदर्शने व आंदोलनांची शक्यता आहे. या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे आदेश देण्यात आले आहेत.