
मंडणगड : विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आंबडवे येथील प्रा. राजेंद्र राऊत यांना संगणकशास्त्र या विषयात जे.जे.टी. विद्यापीठ, राजस्थान यांनी पी.एच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान केली. त्यांनी "अनालाइजिंग डिफरंट इशूज अँड चॅलेंजेस इन अडोप्शन ऑफ आयओटी बेस्ड सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन सिस्टीम" या विषयावर डॉ. प्रज्ञा वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. दीपक रावेरकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.