
रत्नागिरी : १० जुलै १९५७ हा भारतातील मत्स्य उत्पादकांसाठी एक संस्मरणीय दिवस आहे. या दिवशी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी (२१.११.१९२१ ते १२.०९ २०१४) यांनी डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही (२७.०५.१९१८ ते २६.०९.२०१०) यांच्या सहकार्याने भारतीय प्रमुख कारप माशांच्या प्रेरेई प्रजानामध्ये पहिले यश संपादन केले होते. यामुळेच भारतीय कार्प माशांचे बिजोत्पादन आणि परिणामी त्यांचे संवर्धन करण्यामध्ये लक्षणीय वाढ झाली. याचे फलित म्हणून पुढे भारतामध्ये ‘निल क्रांतीची’ मुहूर्तमेढ रोवली गेली असे म्हटले जाते. दिनांक १० जुलै या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन भारत सरकारने २००१ मध्ये १० जुलै हा ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ म्हणून घोषित केला आहे. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवड संपूर्ण देशभर मत्स्य शेतकऱ्याकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाचे हे २५ वे वर्ष देखील मोठ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ अंतर्गत रत्नागिरी येथे असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रा’ मार्फत साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून संशोधन केंद्रामध्ये ‘शोभिवंत मत्स्यपालन: इंद्रधनु क्रांतीकडे वाटचाल’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
चर्चासत्राचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र प्रमुख, डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, तसेच मुंबईतील जेष्ठ मत्स्य व्यावसाईक श्री. श्रीराम हातवलने हस्ते आणि आणि इतर मान्यवरांद्वारे डॉ. हिरालाल चौधरी आणि डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून करण्यात आले. यावेळी सर्व उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.
चर्चासत्राच्या सुरुवातीच्या सत्रामध्ये उपस्थित शोभिवंत मत्स्य व्यावसायिकांची स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, तसेच ‘रत्नागिरी शोभिवंत मत्स्य पालक संस्थेचे’ अध्यक्ष श्री. फहद जमादार, तसेच सदस्य श्री. श्रीराम हातवलने, श्री विस्पी मिस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातून तसेच बेळगाव (कर्नाटक) आणि गोवा राज्यातील जवळपास ४० शोभिवंत मत्स्य व्यावसाईक उपस्थित होते. डॉ. आसिफ पगारकर यांनी प्रास्ताविक भाषण करताना राज्यात मत्स्य शेतीमधील संशोधन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणारी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, हि मातृसंस्था असल्याचे नमूद केले. तसेच उपस्थितांपैकी बहुतेकांनी या संशोधन केंद्रात प्रशिक्षण घेतले असल्याने. श्री. ऋषिकेश भाटकर, जिल्हा समन्वयक, यु.एन.डी.पी. प्रकल्प, कांदळवन कक्ष, रत्नागिरी यांनी कांदळवनातील विविध मत्स्यशेतीचे प्रकार आणि त्यासाठी असलेले अनुदान योजना यांचे सादरीकरण केले. या चर्चासत्र दरम्यान विविध मत्स्य व्यावसायीकांनी मार्गदर्शन केले. श्री. श्रीराम हातवलणे यांनी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय वृद्धि करिता शासनाने हाथभार लावला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. तर श्री. विस्पी मिस्त्री यांनी अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात यावे अशी आशा व्यक्त केली. यावेळी श्री. नितीन बापट, जळगाव; जावेद म्हेतर, कोल्हापूर; श्री. विकास पाटील, बेळगाव; श्री. मन्सूर पाटील, गडहिंग्लज; चेतन साळुंके, पुणे; राकेश सावंत, घाटकोपर, मुंबई; रुपाली व जगदिश मुकादम, कल्याण, ठाणे; मुबारक सुतार, कागवाड, बेळगाव या सर्वांनी आपण सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात विविध प्रशिक्षण केले असल्याचे सांगताना, प्रशिक्षणाचा आणि मार्गदर्शनांचा व्यवसायामध्ये उपयोग होत असल्याचे सांगितले. श्री. राजकिरण साटम, दहिसर, मुंबई; श्री. दिग्विजय गोरे, श्री. सचिन सुवारे, रत्नागिरी, श्री. सुयोग भागवत, रत्नागिरी; श्री. अल्बर्ट अमन्ना, अंबरनाथ, ठाणे; किशोर सामंत, कुर्ला; तनवीर सईद, मुंबई; मॅथु डिसिल्वा, डॉ. सुबिन मॅथु व श्री. मयूर देव, मुंबई यांनी चर्चासत्रामध्ये सक्रीय सहभाग नोंदविला.
यावेळी शेवटच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व सक्रीय शोभिवंत व्यावसाईकांना या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल आणि चर्चासत्रामध्ये सहभागाबद्दल प्रशंसापत्रक देण्यात आले. आपले अध्यक्षीय भाषण करताना डॉ. केतन चौधरी यांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये व्यावसाईकांनी एकत्र आल्यास व्यवसायामध्ये येणारे अडथळे दूर करण्यास एकमेकांची मदत होऊ शकते असे सांगितले. याच सहकाराच्या भावनेतून ‘रत्नागिरी शोभिवंत मत्स्य व्यवसायिक’ या संस्थेची निर्मिती झाली त्याबद्दल त्यांनी या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन सुद्धा केले. तसेच त्यांना लागणारे सहकार्य भविष्यातही करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. अपूर्वा सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन साटम यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे विशेष मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आसिफ पागारकर, प्राध्यापक; डॉ. हरिष धमगये, अभिरक्षक व प्राध्यापक; प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी; श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, श्रीम. ए. एन. सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाकरिता श्री. रमेश सावर्डेकर, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक; श्री. मनिश शिंदे, मत्स्यालय यांत्रिक; श्रीम. जे. जे. साळवी, वरिष्ठ लिपिक; श्री. सचिन पावसकर, लिपिक; श्री. दिनेश कुबल, बोटमन; श्री. सुहास कांबळे व श्री. राजेंद्र कडव, शिपाई, श्री. सचिन चव्हाण, मजूर, श्री. प्रवीण गायकवाड, क्षेत्र संग्राहक; श्री. तेजस जोशी, श्री. प्रशांत पिलणकर, श्री. योगेश पिलणकर, श्री. स्वप्नील आलीम व श्री. अभिजित मयेकर यांनी परिश्रम घेतले.