
कुडाळ : वेताळ बांबर्डेत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत आमदार निलेश राणे यांच्या लोकप्रियतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सभा सुरू असताना अचानक पाऊस आल्याने वीजपुरवठा खंडित झाला, मात्र, तरीही उपस्थित ग्रामस्थांनी आपली जागा सोडली नाही.
वीज गेल्यावर उपस्थितांनी आपापल्या मोबाईलची टॉर्च लावून सभेतील वातावरण कायम ठेवले. या प्रसंगी आमदार राणे यांचे भाषण सुरूच होते आणि उपस्थित नागरिक शांतपणे त्यांचे विचार ऐकत होते. पावसाच्या आणि वीजपुरवठ्याच्या व्यत्ययानंतरही ग्रामस्थांनी दाखवलेल्या या एकजुटीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला.
आमदार निलेश राणे यांच्या कामावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यांच्या सभेला उपस्थित राहिले. तसेच, नैसर्गिक अडचणी आल्या तरीही त्यांना न जुमानता सभेला शेवटपर्यंत थांबून राहिल्याने, राणे यांच्या नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा अधोरेखित झाला आहे. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनाही लोकांना एकत्र आणणे सोपे जात असल्याचे दिसून येते.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, रचना नेरुरकर, रेवती राणे, माजी सभापती नूतन आईर, श्रुती वर्दम आदी उपस्थित होते.
यावेळी उबाठा शिवसेनेचे युवा अध्यक्ष भिवा कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप सावंत, माजी उपसरपंच संतोष कदम, माजी उपसरपंच दिनेश कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव बाबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.