कापड दुकानाला आग...लाखोंचं नुकसान

Edited by: लवू परब
Published on: August 28, 2025 14:30 PM
views 489  views

दोडामार्ग : गणेश चतुर्थी सणाच्या धामधुमीत गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग बाजारपेठेतील बाँम्बे टेक्सटाईल या कापड दुकानाला आकस्मिक आग  लागल्याने लाखोचे नुकसान झाले.  अशी माहिती दुकान मालक हरिश्चंद्र दत्ताराम मळीक यांनी दिली. यावेळी नगरपंचायत अग्निशमन बंबने आगीवर नियंत्रण आणले.

      याबाबत अधिक माहिती आशिकी एका गाडीतून पेट्रोल व डीझेल कॅन मध्ये भरून वाहतूक केली जातं होती. सदर गाडी दोडामार्ग बाजार पेठ येथे पोहचली असता गाडीतील पेट्रोल ला अचानक आग लागली यावेळी गाडीत मोठा स्पॉट होणार या हेतूने गाडी चालकाने गाडीतील पेट्रोलचे कॅन रस्त्याच्या बाजूला टाकले यावेळी मोठ्या प्रमाणात आगीने रुद्र रूपं धारण केले आणि कपड्याच्या दुकानाला मोठी आग लागली. यावेळी दुकानात बाहेरील सुशोभीकरण व कोडे जळून खाख झाले. नगरपंचायत बंब, कर्मचारी, स्थानिक नागरिक व्यापारी यांनी आगीवर नियंत्रण मिळवले यामुळे इतर दुकाने वाचली. रस्ता पार करून आग पलीकडे जाऊन काही दुकानाचे बोर्ड देखील जळाले. 

 दोडामार्ग सावंतवाडी मार्गावर मुख्य बाजारपेठ मध्ये हरिश्चंद्र मळीक यांचे मोठे कापड दुकान आहे. गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पेट्रोल डीझेल वाहतूक करणाऱ्या वाहनात आग लागली. यामुळे पेट्रोल डीझेल भरलेले ३५ लिटर कॅन वाहन धारकाने गजबजलेल्या दोडामार्ग बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर उतरून निघून गेला. आणि अचानक मोठा आवाज येत  आगीचा भडका उडाला. अद्याप काही दुकाने उघडली देखील नव्हती. 

पेट्रोल, डीझेल मुळे आगीचा भडका उडाला तोच दुकानाचा बोर्डला लक्ष करत आग वर पर्यंत पोहचली. रस्त्यावर आगीचा भडका यामुळे वाहने अडकून पडली. यावेळी काही जणांनी फोन करून नगराध्यक्ष यांना फोन केला. बाजारातील लोक मदतीला धावून आले. पाणी मारा सुरु झाला. बाजारात तातडीने नगरपंचायत बंब दाखल होऊन पाणी मारायला सुरुवात करत आगीवर नियंत्रण मिळवले.