
मंडणगड : बौध्दजन ग्रामस्थ मंडळ बाणकोट मुंबई, भारतीय बौध्द महासभा बाणकोट शाखा क्रंमाक २ व आदर्श महिला मंडळ बाणकोट यांच्या संयुक्त विद्यमाने बाणकोट परिसरातील जि.प.मराठी शाळा बाणकोट २ मराठी, जि.प. मराठी शाळा नारायणनगर वेळास या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहीत्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक रविंद्र चव्हाण, सरपंच नुरुल्ला परकार, उपसरपंच अजय नाचरे, या प्रमुख अतिथींसह तिन्ही मंडळांचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शालपयोगी शैक्षणीक साहीत्याचे वाटप करण्यात आले.