
रत्नागिरी : जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघातून 7 जणांनी आपले नामनिर्देशन पत्रे मागे घेतली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 38 उमेदवार निवडणूक लढवित आहेत,अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
263 - दापोली, 263- रत्नागिरी आणि 267- राजापूर मधून प्रत्येकी एका उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर 264 गुहागर आणि 265 चिपळूण मध्ये प्रत्येकी दोघाजणांनी माघार घेतलेली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 263- दापोलीमध्ये 9, 264 -गुहागरमध्ये 7, 265- चिपळूणमध्ये 6, 266- रत्नागिरी व 267- राजापूरमध्ये प्रत्येकी 8, असे एकूण 38 झाली आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक लढवित असणाऱ्या उमेदवारांची नावे, पक्ष आणि चिन्ह आणि माघार घेतलेली नावे अशी आहेत.
263-दापोली विधानसभा मतदार संघ - अबगुल संतोष सोनू - महाराष्ट्र नवनिर्माण सेना- रेल्वे इंजिन, कदम योगेश रामदास - शिवसेना -धनुष्यबाण, कदम संजय वसंत - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) - मशाल, मर्चंडे प्रविण सहदेव - बहुजन समाज पार्टी - हत्ती, कदम योगेश रामदास - अपक्ष - हिरा, कदम योगेश विठ्ठल - अपक्ष - विजेचा खांब, कदम संजय सिताराम - अपक्ष - चिमणी, कदम संजय संभाजी - अपक्ष - शिट्टी आणि खांबे ज्ञानदेव रामचंद्र- अपक्ष - बासरी.
माघार घेतलेली नावे - खाडे सुनिल पांडुरंग
264-गुहागर विधानसभा मतदार संघ - गांधी प्रमोद सिताराम - महाराष्ट्र नवनिर्माण सेना - रेल्वे इंजिन, जाधव भास्कर भाऊराव- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) -मशाल, बेंडल राजेश रामचंद्र- शिवसेना - धनुष्यबाण, प्रमोद परशुराम आंब्रे - राष्ट्रीय समाज पक्ष - ऑटो रिक्षा, फडकले संदीप हरी - अपक्ष - बॅट, मोहन रामचंद्र पवार - अपक्ष -शिट्टी, सुनिल सखाराम जाधव - अपक्ष - अंगठी
माघार घेतलेली नावे - संतोष लक्ष्मण जैतापकर, संदेश दयानंद मोहिते
265- चिपळूण विधानसभा मतदार संघ - प्रशांत बबन यादव - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार- तुतारी वाजवणारा माणूस, शेखर गोविंदराव निकम- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - घड्याळ, सौ. अनघा राजेश कांगणे - अपक्ष -शिट्टी, प्रशांत भगवान यादव- अपक्ष- ट्रम्पेट, महेंद्र जयराम पवार - अपक्ष - माईक, - शेखर गंगाराम निकम- अपक्ष - फूलकोबी
माघार घेतलेली नावे - सुनिल शांताराम खंडागळे, नसिरा अब्दुल रहिमान काझी .
266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघ - उदय रविंद्र सामंत - शिवसेना - धनुष्यबाण, सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) - मशाल, भारत सिताराम पवार - बहुजन समाज पार्टी - हत्ती, कैस नुरमहमद फणसोपकर- अपक्ष- वाळुचे घड्याळ, कोमल किशोर तोडणकर - अपक्ष - संगणक, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील - अपक्ष - काडेपेटी, दिलीप काशिनाथ यादव -अपक्ष - इस्त्री,पंकज प्रताप तोडणकर -अपक्ष - बॅट.माघार घेतलेली नावे - उदय विनायक बने
267- राजापूर विधानसभा मतदार संघ - किरण रविंद्र सामंत - शिवसेना - धनुष्यबाण, जाधव संदिप विश्राम - बहुजन समाज पार्टी - हत्ती, राजन प्रभाकर साळवी - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) -मशाल,अमृत अनंत तांबडे - अपक्ष - चिमणी, अविनाश शांताराम लाड - अपक्ष - शिट्टी, यशवंत रामचंद्र हर्याण - अपक्ष - चालण्याची काठी, राजेंद्र रविंद्रनाथ साळवी - अपक्ष - बॅटरी टॉर्च, संजय आत्माराम यादव - अपक्ष - फणस.
माघार घेतलेली नावे राजश्री संजय यादव.