
रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबई येथे बदली झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी अडीच वर्षे जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना पोलिसांसाठी वेगवेगळी चांगले उपक्रम राबवले होते.
याशिवाय जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळली होती. त्यांच्या काळात त्यांनी अनेक मोठे गुन्हे उघडकीला आणले होते. धनंजय कुलकर्णी यांची अप्पर आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई येथे बदली झाली आहे. एक उत्तम अधिकारी म्हणून धनंजय कुलकर्णी यांची ओळख झाली आहे.