रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी विनायक राऊत यांनाच

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 08, 2023 21:59 PM
views 384  views

कणकवली :उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक मुंबई येथे घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच लोकसभेच्या जागेसंदर्भात र्चच्या झाली. यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी पुन्हा खासदार विनायक राऊत यांचे नाव निश्चित झाल्याचे समजत आहे. या बैठकीला सर्व जिल्हाध्यक्ष ,आमदार ,खासदार , उपस्थित होते. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुढील लोकसभेची रणनीती आखण्यास सुरुवात झाली असल्यास दिसत आहे