
रत्नागिरी : रत्नागिरीत गो हत्या प्रकरण समोर आलं होत. त्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली होती. माजी खासदार निलेश राणेंनी याप्रकरणी 'X' वर पोस्ट करत प्रशासनाला इशारा दिलाय. 48 तास संपल्यानंतर आरोपी पकडले गेले नाहीत तर हिंदू समाजाचा भव्य मोर्चा निघणारच, निलेश राणे म्हणालेत.
निलेश राणे काय म्हणालेत ?

रत्नागिरीतील गो वंश हत्येच्या घटनेनंतर हिंदू बांधव आक्रमक झाला आहे, आरोपी पकडलेच गेले पाहिजे ही आमची मागणी आहे. ही गोष्ट प्रशासनाने दुर्लक्षित करु नये. आज ४८ तास संपल्यानंतर जर आरोपी पकडले गेले नाहीत तर त्याचे परिणाम दिसून येतीलच. उद्या सकाळी रत्नागिरीत सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा निघणारच ! त्यात मी ही सहभागी होतोय, तुम्हीही व्हा.