
मंडणगड : राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत जिल्हा मानधन सन्मान समिती रत्नागिरी चे सदस्यपदी तालुक्सातील टाकेडे येथील निवृत्त शिक्षक व शाहीर अनंत वामन शिंदे यांची निवड झाली आहे . पालकमंत्री नामदार उदय सामंत रत्नागिरी यांचे पत्र जावक क्रमांक ९८५ २ ऑगस्ट २०२५ व नामदार योगेश कदम गृहराज्यमंत्री यांचे विशेष सहकार्याने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील मंजूर टिप्पणी १४/ ऑगस्ट २०२५ आदेशाने समितीचे सदस्यपदी झालेल्या नियुक्तीचे पत्र श्री शिंदे यांना प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेले श्री शिंदे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद कोकण विभागाचे उपाध्यक्ष आहेत. तसेच तालुक्याचे माजी अध्यक्ष आहेत. निवृत्तीनंतर ते कला सहकार समाजकारण शेती व राजकारण अशा विविध क्षेत्रात समाजपयोगी काम करीत आहेत. शाहीर परिशदेचे तालुका अध्यक्ष पदाचे कार्यकाळात काळात तालुक्यात सर्वांच्या सहकार्याने कोकणातील कला भवन उभे राहिले ते परमहंस गुरु गणपती घराण्याचे मार्गदर्शक व मुख्य सल्लागार आहेत. भगव्याचा सच्चा पाईक असणाऱ्या निस्वार्थी सेवाभाव जपत जनसेवेसाठी अविरत झटणाऱ्या व्यक्तीची झालेली निवड अस्सल कलावंतांसाठी अभिमानाची व गौरवाची आहे. त्याबद्दल तालुक्यातुन आनंद व्यक्त केला जात आहे. ११ सप्टेबंर २०२५ रोजी त्यांना निवडीचे प्रत मिळाल्याचे मिळाल्याचे औचित्य साधून त्यांच्या राहत्या घरी टाकेडे गावी त्यांचा सपत्नीक पंचम सन्मान करण्यात आला तो करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई शाखा जिल्हा रत्नागिरी शाखा तालुका मंडणगड परमहंस गुरु गणपती घराणे कोकण विभाग शंभूराजे घराणे कोकण विभाग टाकेडे ग्रामस्थ मंडळ उत्कर्ष महिला मंडळ अशा पाच संस्थांच्या वतीने सन्मानाचा पंचम साधन गौरव करण्यात आला.
यावेळी शाहीर परिषद कोकण प्रमुख अरविंद जाधव, जिल्हाध्यक्ष श्रीधर कदम, सचिव गोपीनाथ सालेकर ,तालुका अध्यक्ष व परमहंस गणपती घराणे अध्यक्ष अनंत येलमकर खजिनदार संजय सुगदरे गुरु गणपती घराणे कार्याध्यक्ष रमेश शिंदे साहेब विश्वस्त व कोषाध्यक्ष शांताराम भेकत शंभूराजे घराणे चिट्ठी मालक शाहीर सखाराम माळी चंद्रकांत चव्हाण गोरीवले,गणपत साळवी असंख्य ग्रामस्थ महिला आवर्जून उपस्थित होते. सर्व संस्थाप्रमुखांनी आपल्या शुभेच्छा देताना माननीय शिंदे गुरुजींच्या कार्याचा गौरव करून दोन्ही मंत्री महोदयांना धन्यवाद दिले. सन्मानाला उत्तर देताना श्री शिंदे म्हणाले सर्वांना अभिमान वाटेल असे कार्य माझ्याकडून सर्वांच्या सहकार्याने विश्वासाने घडेल झालेली निवड सार्थकी लावीन संधीचे सोने करून स्वतःसर्व कलाकाराना समान न्याय देत तन-मन धनाने सेवेस तत्पर असेन . कोणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपला आशीर्वाद आपला विश्वास कायमस्वरूपी टिकवण्यास मी बांधील राहीन माननीय मंत्री महोदयांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वास मी नक्की सार्थ ठरवून दाखवेन. आपल्या सर्वांनी असाच आशीर्वादाचा हात माझ्या शिरावर ठेवा व मला शक्ती द्या बळ द्या विश्वास ठेवा असे बोलत निवडीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश गुळेकर गुरुजी यांनी केले.