पालघरवाडी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचं देखाव्यातून समाजप्रबोधन

Edited by: मनोज पवार
Published on: August 28, 2025 19:41 PM
views 148  views

मंडणगड : जिल्हा व राज्य स्तरावरील शासन व विविध संस्थाचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या तालुक्यातील पालघऱवाडी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचेवतीने यंदा सजिव देखाव्यांचे माध्यमातून मोबाईलचा अतिवापर कमी करण्याचा संदेश दिला आहे. पर्यावरण पुरक गणेशोत्सव व टाकाऊवस्तुपासून शक्य तितक्या नैसर्गीक वस्तुंचा वापर करुन सजावट करणाऱ्या या मंडळाने यंदा गणेशभक्तांसाठी सर्वाथाने वेगळा पण ज्वलंत विषय हाताळला आहे.

बदलत्या समाजमनात लहान मुलांपासून म्हातार्या व्यक्तीपर्यंत सर्वांच्या जीवनाचा मोबाईल हा जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मिडीया रिल व मोबाईल गेम्समध्ये लोकांचा वेळ वाया जात आहे आरोग्य खराब होत आहे व यापासून लहान मुलेही वाचलेली नाहीत मोबाईलचे अतिवापराचा मानवी आरोग्यसह समाजजीवनावर विपरीत परिणाम झाली आहे.

लहानपणी खेळणारी बागडणारी व उत्साहाने भरलेली मुले आता मोबाईलवर खेळ खेळीत आहे घराशी व समाजाशी त्यांचे असलेले नाते तुटत चालेलेले आहे हे थांबवणे गरजचे आहे याकरिता मोबाईलचा माहीती मिळवण्यासाठी गरजेपुरता वापर प्रत्येकाने केला पाहीजे मोबाईलचे राक्षपासून कुंटुंब समाज व देश वाचवणे गरजेचे आहे त्यासाठी पालघरवाडीचे बालगोपाळ गणेशभक्ताचे स्वागत प्रवेशद्वाराशी संवाद व संदेशाचे माध्यमातून करता पुढे गणरायांचे दर्शन घेतलेल्या लहान मुलांचे पुर्वीचे खेळांशी प्रात्यक्षीके दाखवली जातात यात पालघरवाडीचे बालकलाकार लगोरी, अबादुबी, गोट्या, विटू दांडू, आईचे पत्र हरविले, पकडा पकडी, आंधळी कोशींबीर असे एकाहुन एक अधिक खेळ करुन पुर्वीच्या खेळांची माहीती देतात एक वेगळी संकल्पनाजी आजच्या पालक व मुलाना गरजेची आहे तिचे सादरीकरण करुन सामारोपास मोबाईलचा शक्य तितका कमी वापर करण्याचा संदेश देतात काही वेळासाठी एका वेगळ्या जगात सगळ्याना घेऊनन जातात सर्वांनी एकदा या उत्सवास भेट देऊन ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे.  उत्सवाचे आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक बैकर सेक्रेटरी अनंत घाणेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व वाडीतील ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.