दहागावात आखिल भारतीय छावा मराठा संघटना संपर्क कार्यालय

Edited by: मनोज पवार
Published on: August 28, 2025 19:12 PM
views 54  views

मंडणगड : आखिल भारतीय छावा मराठा संघटना रत्नागिरी संपर्क प्रमुख नितीन दळवी यांच्या मुख्य उपस्थितीत 27ऑगस्ट 2025 रोजी दहागाव येथे जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास दहागाव तंटा मुक्त अध्यक्ष सुरेश खाडे, अँड,अभिजित गांधी, जितेंद्र पाटील,राजेश दळवी, संदीप दळवी, संदेश दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचीत्यसाधून अण्णा मोरे प्रदेश सचिव छावा संघटना, प्रदीप चिंचोले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखील  छावा संघटन मंडणगड तालुका संपर्क प्रमुखपदी मदन दळवी, तालुका प्रमुख पदी महेंद्र सावंत, तालुका युवा संपर्क प्रमुख शिवम दळवी, उप संपर्क प्रमुखपदी  अमीर जोगीलकर,  संघटन प्रमुख मुज्जमिल जोगीलकर, दहागाव महिला अध्यक्षपदी प्रभावती हळदवणेकर   यांची नियुक्ती झाल्याचे नियुक्तपत्र देऊन घोषीत करण्यात आले याचबरोबर छावा संघटना खेड तालुका प्रमुखपदी श्रीकांत शिंदे तालुका प्रमुखपदी संदीप यादव यांची निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष सुनील खाडे मदन दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात नितीन दळवी यांनी सांगीतले की सामाजातील दुर्लक्षीत घटकांचे समस्यांसाठी राजकारण विरहीत दृष्टीकोन ठेवून संघटना राज्यात काम करीत आहे. नागरीकांच्या विविध समस्यांसाठी जिल्ह्यात काम करणार असून समाजाचे विविध प्रश्न व समस्या व प्रशासकीय कामे पुर्ण कऱण्यासाठी काम करणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तीनशेहून अधिक कार्यकर्ते संपर्कात असून लवकर सर्व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार आहेत. संघटनेच्या माध्यमातून तालुक्यासाठी रुग्णवाहीका सेवा उपलब्ध करुन देणार असल्याचेही यावेळी सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालना अँड. अभिजीत गांधी यांनी केले कार्यक्रमास दहागाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.