क्रांतिदिन स्वातंत्र्यसैनिकांच्या बलीदानाचा सन्मान दिवस : डॉ. सुनिल पाटील

Edited by: मनोज पवार
Published on: August 10, 2025 15:42 PM
views 150  views

रत्नागिरी : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुणवत्ता हमी कक्षा अंतर्गत इतिहास विभाग, आजीवन विस्तार विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमा अंतर्गत क्रांतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक  म्हणून माजलगाव येथील श्रीसिध्देश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुनिल पाटील हे ऑनलाईन उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांच्या हस्ते मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा. काझी यांनी कार्यक्रमाचा उददेश  स्पष्ट केला. 

यावेळी क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य  सैनिक, क्रांतिकारक आणि हुतात्मे यांच्या जीवनावर आधारीत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्षनाचे उद्घाटन  उपप्रचार्य डॉ. विष्णु जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. संदीप निर्वाण यांनी यावेळी भारतास स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कशा प्रकारे इंग्रज सत्तेविरुध्द लढा दयावा लागला हे  नवीन पिढीस तसेच युवा वर्गास माहिती व्हावे, आपल्या स्वातंत्र्य लढयातील जाज्वल्य पर्व ज्ञान व्हावे व इतिहासाचा हा वैभवशाली वारसा त्यांना मिळावा आणि यातून देशभक्ती वृध्दिंगत व्हावी या उद्देशाने सदर पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे असे सांगितले. सदर पोस्टर प्रदर्शनाचा लाभ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.   

पोस्टर प्रदर्शनावेळी इतिहास विभागाच्या डॉ.  ज्योती पेठकर यांनी सांगितले की, ऑगस्ट 1942 रोजी चले जाव, छाडो भारत आंदोलनाची सुरुवात झाली.  काँग्रेस कार्यकारिणी  बैठकीमध्ये छोडो भारत आंदोलनाचा ठराव पास झाला.  या आंदोलनामुळे भारतातील प्रमुख नेत्यांना आटक करण्यात आली. तरीही लोकांनी स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन चालूच ठवले.  भूमिगत नेत्यांनी या आंदोलनातील कार्यकत्र्यांनां मार्गदर्शन  केले.  यावळी आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी जो लढा दिला आहे तो  निष्चितच प्रेरणादायी आहे. असे सांगून भारतीय स्वातंत्र्य लढयात सहभागी झालेल्या अनेक क्रांतिकारकांची थोडक्यात माहिती सांगितली. 

ऑनलाईन मार्गदर्शन  करताना डॉ. सुनिल पाटील यांनी सांगितले की, क्रांतिदिन हा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचा आणि बलीदानाचा सन्मान करणारा दिवस आहे. क्रांतिदिन साजरा करण्यामध्ये अनेक आंदोलकांनी केलेले एकजूट शिस्त आणि देशभक्ती हे पैलू आजच्या युवकांनी अंगीकारावेत. स्वतंत्र्यसैनिकांनी स्वतःच्या सुखाचा, परिवाराचा आणि आयुश्याचा विचार न करता देशासाठी बलीदान दिले. आजच्या युवकांनीही स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाचा आणि देशाच्या भल्याचा विचार करावा.  तसेच देशाच्या जडणघडणीतील व स्वातत्र्यलढयातील या महान क्रांतिकारकांच्या कार्याचे महत्व थोडक्यात विशद  करताना क्रांतिकारकांच्या कार्याचा आदर्श  घेवून आपण सर्वांनी देशासाठी आपल्या क्षमतेप्रमाणे योगदान देण्याचा संकल्प करावा असे मत व्यक्त केले. 

अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये यांनी सांगितले की,  देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करणा-या विविध राष्ट्रवादी  प्रवाहांचा परिचय करुन देताना अहिंसात्मक चळवळीचे नेतृत्व करणारे महात्मा गांधी तसेच क्रांतिकारकांच्या कर्याला पाठिंबा देणारे लोकमान्य टिळक यांच्या कार्याचे भारतीय इतिहासातील महत्व स्पष्ट केले. प्रमुख राष्ट्रीय चळवळीबरोबरच क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, स्वा. सावरकर, चाफेकर बंधू आदींचे कार्यसुध्दा  तितकेच महत्वाचे आहे.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. ज्योती पेठकर, प्रा. हनुमंत सुतार, प्रा. शरिफ काझी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप यांनी मानले.

                               ............