सावर्डे विद्यालय परिसरात वृक्षारोपण

एक झाड हजारो जीवांचे जीवन : राजेंद्र वारे
Edited by: मनोज पवार
Published on: June 16, 2025 12:26 PM
views 145  views

सावर्डे : वृक्षारोपण म्हणजे निसर्गाशी मैत्री करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ व शुद्ध पर्यावरण देणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच वृक्षारोपण ही केवळ एक गरज नाही, तर ही जबाबदारी आहे.आजच्या युगात वाढते प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड, आणि जलवायू संकट यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. अशा परिस्थितीत वृक्षारोपण  करणे व त्याचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून प्रत्येक विद्यार्थ्यांने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे व हजारो जीवांचे जीवन संरक्षित करावे असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले.

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षरोपण हा उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी वृक्षारोपणाचे महत्त्व व त्याची आवश्यकता का आहे याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना प्रेरित करण्यात आले. यावेळी सावर्डे सहान व शालेय परिसरात वड, पिंपळ व फळझाड रोपांची लागण करून परिसरातील ग्रामस्थांच्या मध्ये वृक्षारोपण व संवर्धन याची जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांचे संवर्धन कसे करावे याची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देऊन नियोजन करण्यात आले. सावर्डे परिसरात वृक्षारोपण करत असताना कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक व प्राचार्य राजेंद्र वारे