रेशन दुकानचं नेटवर्क 'गुल' | बांदयात भाजपची दुकानावर 'धडक'

ऑफलाईन धान्य वितरित करण्याची ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांची मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 21, 2022 19:01 PM
views 198  views

बांदा : बांदा येथील शासनमान्य रास्त दराच्या दुकानात दिवाळीच्या तोंडावर नेटवर्क गुल झाल्याने ग्राहकातून संताप व्यक्त करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच भाजपच्या वतीने दुकानावर धडक मारत दिवाळी तोंडावर आली असून ग्राहकांना ऑनलाईनसाठी ताटकळत न ठेवता त्यांना ऑफलाईन धान्य वितरित करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी केली. तर याबाबत लवकरच जिल्ह्या पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी करणार, असे खतीब यांनी सांगितले.तर एकूण या कार्यपद्धतीच्या हट्टाबाबत भाजपाच्या वतीने नाराजी व्यक्त केली.

दिवाळी दोन दिवसावर आहे त्यातच गेले काही महिने रास्त दराचे धान्य महिन्याच्या 15 तारीख नंतर येत असल्याने ग्राहकांची तारांबळ उडते हे प्रशासनाला माहिती आहे. यातच नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना ताटकळत रहावे लागते शुक्रवारी सकाळी बांदा येथील रास्त दराच्या दुकानात नेटवर्क नसल्याने अनेकांना अडकून पडावे लागले.

याबतची माहिती मिळताच बांदा भाजपाच्या पदाधिकारी यांनी दुकानात धडक मारली व याबाबत जाब विचारला मात्र तेथे नेटवर्क चे कारण देण्यात आल्याने ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी वरिष्ठांना फोन करून ऑफलाईन  धान्य वितरित करावे अशी मागणी केली. तसेच येत्या काळात किमान दहा तारीखला धान्य दुकानावर उपलब्ध करावे जेणेकरून ग्राहकांना त्रास होणार नाही अशी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी करणार असे सांगितले. 

यावेळी जावेद खतीब, सुभाष मोर्ये, भाजपा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, गुरू सावंत, युवा नेते संदीप बांदेकर,  आदी उपस्थित होते