
देवगड : रापण महोत्सवाचे देवगड कुणकेश्वर येथील बिचेसवर आयोजन करण्यात आलेआहे.पारंपारिक रापण महोत्सव समिती कुणकेश्वर कुणकेश्वर कातवण,श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर व कातवण ग्रामपंचायत, कुणकेश्वर विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी,देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ८ नोव्हेंबर ते सोमवार ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत रापण महोत्सव २०२४ चे आयोजन कुणकेश्वर येथे करण्यात आले आहे. या रापण महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
या निमित्ताने येथील कृषी व मत्स्य प्रदर्शन व विविध खाद्यपदार्थांचे तसेच ताज्या मासळीची चव खवय्यांना यानिमित्तानेचाखता येणार आहे. खवय्यांसाठीची ही एक मोठी पर्वणीचअसणार आहे.
या रापण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ढोलपथक वादन, सायंकाळी ७ ते ८ उद्घाटन समारंभ व मार्गदर्शन मान्यवरांचे सत्कार समारंभ, रात्री ८ ते ११ दिंडी संगीत कार्यक्रम, शनिवार ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ८ मान्यवरांचे मार्गदर्शन व सत्कार समारंभ, रात्री ८ ते ११ राज्यस्तरीय सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा, रविवार १० नोव्हेंबर सायंकाळी ६ ते ८ मान्यवरांचे मार्गदर्शन सत्कार समारंभ, ७ ते ८ सेलिब्रिटींचे स्वागत व सन्मान, रात्री ८ ते ११ सई एंटरटेनमेंट प्रस्तुत अभिनेता निलेश गुरव निर्मित आर्केस्ट्रा जल्लोष २०२४ चे सादरीकरण होणार आहे. सोमवार ११ नोव्हेंबर रोजी ७ ते ८ मान्यवरांचे मार्गदर्शन सत्कार समारंभ ८ ते ११वाजता. स्थानिक कलावंतांच्या सांस्कृतिक कलाविष्कार ,रात्री ११ वाजता कार्यक्रम समारोप होणार आहे.
या वर्षी होणाऱ्या ८ ते ११ नोव्हेंबर २०२४ या वेळेत होणाऱ्या रापण महोत्सवात सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत भव्य कृषी व मत्स्य प्रदर्शन विविध खाद्यपदार्थांची स्टॉल विविध कार्यक्रमांचे आयोजन समुद्रातील विविध प्रकारच्या ताज्या मासळींचे रेसिपी कोकणी जेवणाची मेजवानी विविध शाकाहारी पदार्थही उपलब्ध असणार आहेत.
या रापण महोत्सवास सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या रापन महोत्सवाच्या माध्यमातून देशी-विदेशी पर्यटकांना विविध पारंपरिक मासेमारीची प्रात्यक्षिके कामकाजाची व साधनसमृद्धीची माहिती आणि कोकणी जेवणाची आणि खाद्यपदार्थांची चवही चाखता येणार आहे.म्हणूनच व्यवसायातून पर्यटन विकास हा प्रत्येकाच्या जीवनाचा अभिवाज्य भाग बनवा.त्यातून रोजगार संधी व पारंपरिक संस्कृती जतन करणे हा दृष्टिकोन ठेवून रापण महोत्सवाचे आयोजन आपण करत असल्याचे यावेळी आयोजकांन कडून सांगण्यात आले आहे.