दोडामार्गात भाजपा स्वतंत्र निवडणूक लढविणार : प्रभाकर सावंत

Edited by: लवू परब
Published on: November 04, 2025 20:38 PM
views 87  views

दोडामार्ग : तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती सदस्य भाजपा स्वतंत्र निवडणूक लढविणार असून दोडामार्ग मधील 3 जिल्हा परिषद व 6 पंचायत समिती आपलेच सदस्य निवडून येणार आहेत त्यामुळे पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी दोडामार्गची जि. प. प. स. निवडणूक संदर्भात महत्वाची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा सरचिटणीस श्री. महेश सारंग, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, जिल्हाचिटणीस श्री. सुधीर दळवी, जिल्हा पदाधिकारी श्री. राजन म्हापसेकर, श्री. एकनाथ नाडकर्णी,रमेश दळवी, महिलाध्यक्ष सौ. दिक्षा महालकर आकांशा शेटकर, रुक्मिणी नाईक तालुका सरचिटणीस संजय सातार्डेकर, भैया पांगम, शहराध्यक्ष राजेश फुलारी, नाना देसाई, संतोष म्हावळणकर, सोनल म्हावळणकर, संध्या प्रसादी, कल्पना बुडूकुले, दीपिका मयेकर,हसीना शेख, चंद्रकांत मळीक, दाजी देसाई पंकज गवस सूर्यकांत धर्णे,देवा शेटकर, समीर रेडकर,वैभव सुतार संजय देसाई अजय परब, सुरेंद्र सावंत अजित देसाई, वैभव फाटक, सर्व शक्तिप्रमुख, बूथ अध्यक्ष नगरसेवक, सरपंच व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस श्री. महेश सारंग सूत्रसंचालन भैया पांगम, संघटनात्मक प्रास्ताविक सुधीर दळवी, यांनी केलं तर मनोगत राजन म्हापसेकर एकनाथ नाडकर्णी यांनी केले


फोटो :-