मालवण शहरात राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 29, 2024 11:26 AM
views 177  views

मालवण : अबकी बार चारसो पार.... फिर एक बार मोदी सरकार... राणे साहेबांचा विजय असो... अशा जोरदार घोषणा देत भाजप महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मालवण शहर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. देऊळवाडा श्री देव रामेश्वर  मंदिर, श्री नारायण मंदिर तसेच परिसरातील देवालंय येथे श्रीफळ ठेवून ना. राणे यांच्या विजयाचे साकडे घालण्यात आले. तसेच भरड दत्त मंदिर येथेही श्रीफळ ठेवून मालवण शहर बाजारपेठ येथे प्रचाराला सुरवात करण्यात आली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन राणे साहेब दोन लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील. मालवण शहरात वार्ड बुथ निहाय प्रचार सूरू आहे. राणे साहेबाना मोठे मताधिक्य देण्यासाठी आम्ही सर्व भाजप महायुती पदाधिकारी कार्यकर्ते कटीबद्ध असल्याचा ठाम विश्वास सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर यांसह उपस्थितीत पदाधिकारी यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, हरीश गांवकर, महेश सारंग, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, राजन वराडकर, अशोक तोडणकर, आबा हडकर, केपी चव्हाण, सूर्यकांत फणसेकर, प्रमोद करलकर,शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाध्यक्ष राजा गांवकर, माजी सचिव किसान मांजरेकर, युवसेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख हर्षल पारकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, मनसे पदाधिकारी जिल्हाउपाध्यक्ष गणेश वाईरकर, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, अमित इम्रामपुरकर, विल्सन गिरकर, मनसे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, सागर जाधव, गुरु तोडणकर, महिला प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, शहर अध्यक्ष चारू आचरेकर, पुजा वेरलकर, तारका चव्हाण, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, ममता वराडकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, महिमा मयेकर, स्वाती हडकर, तुलसी चव्हाण, सुनंदा विर, भाग्यश्री ढोलम, यांसह नाना साईल, पंकज पेडणेकर, परशुराम पाटकर, राजेंद्र लुडबे, विलास मुणगेकर, मोहन वराडकर, किशोर खानोलकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, अमोल केळुसकर, राजु बिडये, अभय कदम, निषय पालेकर, विनायक रेडकर, साहिल माशेलकर, कुणाल खानोलकर, वसंत गांवकर, कमलाकर कोचरेकर, संदिप मालंडकर, दादा कोचरेकर, बाबू कासवकर, मुन्ना फाटक, नंदू देसाई, हेमंत तोडणकर, विद्या मेस्त्री यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.